पंढरपूर / . आगामी लोकसभेच्या व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सह मित्र पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादीने मोर्चे बांधणी जोरात करण्यात येणार आहे. यावेळीच्या निवडणुकीमध्ये बारामतीची विद्यमान खा. सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ आहे असा आत्मविश्वास भाजपाचे निवडणूक प्रमुख आ. श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केला,
पंढरपूर येथे विठ्ठल दर्शन येण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेमध्ये सुरू केल्यास सहमित्र पक्षात कोणतेही मतभेद नाही यामुळे आगामी २०२४ च्या निवडणुकीत राज्यात लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० अधिक जागा आमच्या आघाडीला मिळतील असे त्यांनी सांगितले. राज्यातील तीन पक्षाचे सरकार व्यवस्थित चालू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये समन्वय असून सरकारला कोणताही धोका नाही. आगामी निवडणुकीत बारामती सभा मतदार संघात तिन्ही पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे यावेळी सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ असल्याचे त्यांनी सांगितलं.