ग्रामीण भागातील धोरणात्मक विकास कार्यक्रमासाठी आमदार आ.आवताडे अॅक्टिव्ह मोडवर
मंगळवेढा (प्रतिनिधी) - सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत आणि पायाभूत विकास कार्यक्रमांसाठी प्रशासकीय खात्याअंतर्गत आपल्यावर असणाऱ्या कर्तव्यसेवेला तुमच्या कार्य जबाबदारीच्या माध्यमातून गतिमान करा अशा सूचना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंगळवेढा तालुक्याच्या विविध गावांमध्ये जनतेच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी आमदार आवताडे यांचा आमदार आपल्या दारी या अभियानांतर्गत येड्राव, खवे, जित्ती, बावची, जंगलगी, सलगर खु., सलगर बु., लवंगी, आसबेवाडी, शिवणगी, सोड्डी या गावामध्ये गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता.
आ आवताडे या दौऱ्यादरम्यान मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य व इतर विकास व बाबींचा आढावा घेत असताना त्यासाठी या भागातील नागरिकांनी आपल्या समस्या व अडचणींचा अक्षरशः पाऊस पडला. नागरिकांच्या या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्यानंतर आ आवताडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे सुचित केले आहे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत असताना कोणत्याही प्रकारचे कसर न ठेवता आपली कर्तव्य सेवा जबाबदारीने पार पाडत असताना राज्य व केंद्र पातळीवर कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास मी सदैव आपल्या पाठीशी उभा असेन असेही आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारच्या दरबारी प्रलंबित असणाऱ्या ठळक पाणी योजना राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्री महोदय यांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तालुक्यातमध्ये भौतिक सुविधांच्या अनुषंगाने प्रलंबित असणाऱ्या निरनिराळ्या पाणीपुरवठा योजना, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रलंबित कामे, रेशन कार्ड, घरकुल योजना, प्रधानमंत्री पेन्शन किसान योजना, महावितरण अंतर्गत डी.पी आधी समस्यांचा आमदार आवताडे यांनी आढावा घेऊन लवकरात लवकर निपटारा करण्याचे आदेशित केले आहे.
या दौऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, माजी व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी, माजी संचालक सुरेश भाकरे, विजय माने, भारत निकम, राजन पाटील, दिगंबर यादव, दत्तात्रय नवत्रे, सुधाकर मासाळ, युवराज शिंदे, विवेक खिलारे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार मदन जाधव, शिवाजीराव पटाप आदी मान्यवर तालुक्यातील सर्व खात्यांचे प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करुन आ. समाधान आवताडे यांनी जनतेचा विश्वास सार्थ केला आहे. परंतु मंजूर झालेल्या निधीची किती प्रमाणात कार्यवाही झाली आहे याची चाचपणी करुन जनतेच्या अडचणी व समस्या त्यांच्यापर्यंत पोहचून जाणून घेणारे आमदार समाधान आवताडे हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव लोकप्रतिनिधी असल्याचा आम्हाला मतदार म्हणून सार्थ अभिमान व आनंद आहे - श्री.कृष्णा निंबाळकर माजी सैनिक, लवंगी