वेणुनगर, दि. २१ गुरसाळे येथील श्री विठ्ठल सह. साखर कारखाना व धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रा. लि. यांचे संयुक्त विद्यमाने व कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अभिजीत आबा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर सेंद्रिय शेती या विषयावर श्री. विजयकुमार थोरात यांचे मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक श्री. डी. आर. गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सदर प्रसंगी प्रथम श्रीविठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमास उपस्थितीत असलेले प्रमुख पाहुणे व उपस्थितीतांचे स्वागत व प्रास्तावीक कारखान्याचे केन मैनेजर श्री. सुनिल बंडगर यांनी केले.
या कार्यशाळेमध्ये बोलताना धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रा. लि. चे श्री विजयकुमार थोरात म्हणाले की, शेती करताना व्यापारी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शेती करणे आवश्यक आहे. शेती करत असताना तुम्ही शंभर टक्के मातीची काळजी घेतल्यास तुमचे ८० टक्के उत्पादन वाढेल व २० टक्के खर्च होईल. शेती करत असताना जमिनीचा पोत सुधारणेकरीता सेंद्रीय कर्म वाढविणे काळाची गरज आहे. माती व पाणी परिक्षण करण्याऐवजी जमिन व पाण्याची विदयुत वाहकता व सामु तपासणे गरजेचे आहे. त्यानुसार पिकास कोणत्या घटकांची कमतरता आहे हे आपणास जाणून घेता येते. त्यानुसार पिकांना सेंद्रिय अन्नद्रव्ये देता येतील.
रासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे जमिनी क्षारपड होत असुन नापिक होत आहेत. त्याकरीता सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत, गांडुळखत, मासोळी खत ही खते वापरणे गरजेचे आहे. आपण वापर करत असलेले शेणखत कुजण्यासाठी एक वर्ष कालावधी लागतो मात्र सेंद्रिय खत तयार करण्याकरीता जिवाणूंचा वापर केल्यास ते पंचेचाळीस दिवसात कुजते व ते कुजलेले खत पिकास घेण्याकरीता लवकर तयार होते. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपिकता वाढून पिके जोमदार येवुन शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होते. त्यासाठी सेंद्रीय पध्दतीची शेती करावी असे त्यांनी या सेंद्रिय शेती कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालीदास पाटील, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, नवनाथ नाईकनवरे, सिध्देश्वर बंडगर, महेश खटके, तज्ञ संचालक समंश्री दशरथ जाधव, अशोक तोडले, समाधान गाजरे, पंढरपुर पंचायत समिती माजी उपसभापती विष्णु बागल, कारखान्याचे माजी संचालक धोंडीबा वाघमारे, दिपक सदाबसे तसेच कारखान्याचे सभासद तोडणी वाहतुक ठेकेदार, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याचे संचालक श्री दिनकर चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.