पंढरीतील वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप

0
दुष्यंत पवार यांनी जपली सामाजिक बांधीलकी

    पंढरपूर (प्रतिनिधी) -- उन्ह वारा पाऊस यांची तमा न बाळगता आगदी भल्या पहाटे, सकाळी घरोघरी वृत्तपत्र पोहचविणार्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे पावसापासुन संरक्षण व्हावे या सामाजिक हेतुने कुबेर स्टील इंडस्ट्रीज जालना व राजलक्ष्मी स्टील ट्रेडर्स पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
वृत्तपत्र विक्रेता हा सातत्यपुर्ण काम करणारा घटक असून अनेक समस्यांना तोंड देत वृत्तपत्र लोकांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे काम करीत असतात. यामध्ये अनेक वेळा ऊनं वारा पाऊस याचाही सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुरक्षितता घेणे महत्वाचे असते. याचाच विचार करून आपली सामाजिक बांधीलकी जोपासत दुष्यंत उर्फ संतोष पवार यांच्या माध्यमातून, कुबेर स्टील इंडस्ट्रीज जालना व राजलक्ष्मी स्टील ट्रेडर्स पंढरपूर यांच्या सहकार्यातून वृतपत्र विक्रेत्यांना पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले. हे रेनकोट मिळाल्यामुळे आपले पावसापासुन संरक्षण होणार असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येवून संतोष पवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

या रेनकोट वाटप कार्यक्रमासाठी पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष महेश पटवर्धन , गोरख भिलारे, विकास पवार, संतोष कुलकर्णी, सिध्देश्वर सावंत, नवनाथ सावंत, रूपेश हरिदास, सुभाष अल्लापूरकर, बाळु जोशी, काँग्रेस ओबीसी सेलचे संजय घोडके, शिरीष तेंडुलकर यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)