आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून दोन रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी १ लाखाची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य मदत
मंगळवेढा (प्रतिनिधी): पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मंगळवेढा तालुक्यातील नामदेव आप्पा चौगुले व भक्ती सुरेश बोबलादे यांच्या अपघात आरटीए रोगावर उपचारासाठी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आरोग्य उपचारासाठी अर्थसहाय्य रूपामध्ये प्रत्येकी १लाखाची मदत संबंधित रुग्णांच्या बँक खात्यावर प्राप्त झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चौगुले यांच्यावर सिमेटस इनामदार मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल पुणे येथे व बोबलादे यांच्यावर समर्थ हॉस्पिटल मिरज येथे उपचार सुरू आहेत. परंतु या रुग्णांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने सदर आजारावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी या परिवारातील सदस्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधला.
आमदार आवताडे यांनीही दोन्ही रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयामार्फत मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीसाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार करून तेली यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या प्रयत्नांतून नामदेव आप्पा चौगुले व भक्ति सुरेश बोबलादे यांच्या शासकीय बँक खात्यावर प्रत्येकी १ लाख रुपयांची आरोग्य मदत जमा झाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.