शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य : भोसले

0
      पंढरपूर (प्रतिनिधी) - हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला वीस टक्के राजकारण आणि ऐंशी  टक्के समाजकारण हा विचार जोपासत शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देण्याचे कार्य सध्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे. हे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे युवासेना पंढरपूर तालुकाप्रमुख महादेव भोसले यांनी केले.
        शिवसेनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजी बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी महादेव भोसले बोलत होते. या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख विश्वजीत भोसले, उपतालुकाप्रमुख विजय करपे, उपतालुकाप्रमुख  गणपत कोलगे, संघटक शहाजी जगदाळे,  सरपंच राजकुमार पाटील,  बळीराम लोखंडे,  गणेश वसेकर,  भोजलिंग  बाबर,  गंगाधर माने आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
        यावेळी  शहर प्रमुख विश्वजीत भोसले यांनी आपल्या मनोगतातून शिवसेनेच्या माध्यमातून पंढरपूर शहर व तालुक्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तर सत्काराला उत्तर देताना तालुकाप्रमुख शिवाजी बाबर यांनी शिवसेनेचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
       पुढे बोलताना युवा सेना तालुकाप्रमुख  महादेव भोसले यांनी सांगितले की, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली  शिवसेनेचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तालुक्यातील शिवसैनिक प्रयत्नशील आहे. त्यासाठी शिंदे, फडणीस, पवार सरकारकडून घेण्यात येत असलेल्या समाज हिताच्या निर्णयांचा मोठा फायदा होत आहे. तर वरिष्ठ नेते मंडळींचे मार्गदर्शन व सहकारी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य याच्या जोरावर तालुक्यातील शिवसेनेचे संघटन मजबूत झाले आहे. या पुढील काळातही तालुक्याच्या समाजकारणात शिवसेनेचा सर्वात मोठा वाटा असेल अशी ग्वाही युवा सेना तालुकाप्रमुख भोसले यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)