पंढरपूर (प्रतिनिधी) - समाजातील विविध घटकांसाठी बँकांकडून योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेवून महिला, युवक व शेतकरी यांनी आपली प्रगती साधली पाहीजे. त्याचप्रमाणे बँकांच्या समाज कल्याणकारी योजनांना समाजाकडून चांगल्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळाल्यास बँकांकडून चांगल्या स्वरूपाचे मदत होण्यास त्याचा फायदा होतो असे प्रतिपादन माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे बँक ऑफ बडौदाचा वर्धापन दिन येथील शाखेच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गुंजाळ बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी बँक आणि ग्राहक यांचे कामकाजाबाबत समायोजन कशाप्रकारे असावे याबाबत मार्गदर्शन केले.
या आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी नागनाथ माळी , ग्र.प.सदस्य विलास भोसले, हर्षवर्धन शहा, डॉ.हनुमंत खपाले, ऍड . पाटील, शाखाधिकारी गणेश मुळे , सर्जेराव पाटील, दत्ता भोसले, आनंद पाटील, अधिकारी सागर उमाटे, क्लार्क राजु भराटे, दिलीप सुर्यवंशी, नागेश माने, दिपक गुंजाळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थीत होते.
तर यावेळी शाखाधिकारी गणेश मुळे यांनी सांगितले की, बँक ऑफ बडौदाच्या माध्यमातून शेती, व्यवसाय, शैक्षणिक यासह विविध गोष्टींसाठी योजना सुरू असून या योजनांचा फायदा घेतला पाहीजे. तर बँकेच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील ग्राहक नागरिकांना चांगल्या स्वरूपाचे सहकार्य करण्यात येत असून नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुळे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ बडौदा शाखा रोपळे येथील कर्मचार्यांनी विशेष परीश्रम घेतले.