शेतीमालाच्या सुलभ खरेदी विक्रीसाठी प्रयत्न करू :- गायकवाड

0
नारायण गायकवाड यांची पंढरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी निवड
  
पंढरपूर (प्रतिनिधी) - शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतीमाला अनेक वेळा कवडीमोल किमतीने विकण्याची वेळ येते तर याच शेतीमालाचे उत्पादन करण्यासाठी लागणार्या शेती निविष्ठांची खरेदी मात्र चढ्या दराने करावी लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून पंढरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकर्याच्या शेतीमालाची विक्री व कृषी निविष्ठांची खरेदी सुलभपणे व्हावी यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील. असे मत पंढरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे नुतन संचालक नारायण शंकर गायकवाड यांनी व्यक्त केले.
नारायण गायकवाड यांची पंढरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी निवड झालेबद्दल त्यांना संघाचे चेअरमन शांतीनाथ बागल, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे , विठ्ठलाचे  माजी चेअरमन भगीरथ भालके, माजी व्हा चेअरमन लक्ष्मणआबा पवार, सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, नागेश फाटे, अण्णा शिंदे, राहुल कौलगे पाटील , खरेदी विक्री संघाचे नुतन संचालक यांच्यासह तालुक्यातील नेते मंडळींनी  अभिनंदन केले.
पुढे बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, तालुक्यातील वरीष्ठ नेते मंडळींच्या  मार्गदर्शनाखाली तसेच खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळाच्या  सहकार्याने चांगल्या स्वरूपाचे कार्य करून शेतकर्यांच्या शेतीमालाबाबत असणार्या समस्या कमी करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार आहोत. शेतकरी वर्गानेही आपल्या प्रगतीसाठी खरेदी विक्री संघाच्या उपक्रमांचा  विशेष लाभ घ्यावा असे आवाहन संचालक नारायण गायकवाड यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)