सकल जैन समाजाच्या वतीने पंढरपूरमध्ये मूक मोर्चा

0
     पंढरपूर (प्रतिनिधी) - प.पू. १०८ आचार्य श्री कामकुमारनंदी महाराज यांच्या अमानुषपणे झालेल्या हत्त्येचा निषेध करण्यासाठी सकल जैन समाज पंढरपूर आणि तालुका जैन समाजाच्या वतीने मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गणिणी आर्यिका १०५ प्रज्ञामती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवार दिनांक १८ जुलै २०२३ - हिरेकुडी ता.चिक्कोडी जि.बेळगाव येथे प.पू. १०८ आचार्यश्री कामकुमारनंदी महाराज यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. या निषेधार्थ आज दिनांक 20 जुलै 2023 रोजी पंढरपुरातून सकल जैन समाजाच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता. श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महावीर नगर पंढरपूर येथुन सकाळी ठीक ९.०० वाजता हा निषेध मूकमोर्चा काढण्यात आला. तो बोहरी पेट्रोल पंप - भोसले चौक - अर्बन बँक - शिवाजी चौक -सावरकर चौक या मार्गे तहसील कचेरी येथे येऊन पंढरपूरचे अप्पर तहसीलदार तुषार शिंदे यांना निवेदन देण्यात आले .

हत्त्येचा  निषेधार्थ महाराष्ट्र व कर्नाटक तसेच संपूर्ण भारतातून अनेक आचार्यश्री मुनीश्री, आर्यिका समस्त जैन समाजाने ठिकठिकाणी अनेक निवेदन देऊन निषेध नोंदवलेला आहे. मूक मोर्चा काढून सरकारी कार्यालयात आखिल भारतीय सकल जैन समाजाने २० जुलै २०२३ भारत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सकल जैन समाज पंढरपूर शहर आणि तालुक्याच्या वतीने गुरुवार दिनांक २० जुलै २०२३ रोजी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला . या मोर्चामध्ये पंढरपुरसह सरकोली, जैनवाडी, पिलीव, कवठाळी, देगाव इत्यादी ठिकाणचे श्रावक व श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सकल जैन समाज पंढरपूर आणि तालुका श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जय मंदिर महाद्वार पंढरपूर श्री 1008 सु पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर सरकोली तालुका पंढरपूर तसेच पंढरपूर व्यापारी कमिटी च्या वतीने निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)