शेतकरी हिताचे काम करणार - गायकवाड

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री  संघाच्या संचालक पदावरती निवड झाल्याने चांगल्या कामाची संधी मिळणार आहे. या पदाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम करणार असल्याची ग्वाही पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघाचे नुतन संचालक नारायण गायकवाड यांनी दिली.
नारायण गायकवाड यांची निवड झालेबद्दल जनहित शेतकरी संघटनेचे नेते औदुंबर गायकवाड, रोपळे ग्रामस्थ यांच्यावतीने अंबिकानगर येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नारायण गायकवाड बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी वर्गास होणाऱ्या  फायद्याच्या योजनांची माहिती दिली. तर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी कार्य करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी  सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, जनहीत शेतकरी संघटनेचे नेते औदुंबर गायकवाड, अशोक गायकवाड, दादासाहेब रोकडे, महादेव गायकवाड, निलेश कदम, प्रल्हाद गायकवाड, उत्तम गायकवाड, पांडुरंग गायकवाड,  रोहीत वाघमारे, भास्कर रोकडे, अरूण रोकडे, बाबासाहेब पवार, कालीदास साळुंखे  आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संचालक दिनकर कदम , औदुंबर गायकवाड व रोहीत वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून नारायण गायकवाड यांना मिळालेल्या या पदामुळे रोपळे परीसरातील शेतकर्यांना खरेदी विक्री संघाच्या योजनांचा लाभ घेता येणार असून त्याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा असे अवाहन केले. कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन निवेदक रोहीत वाघमारे यांनी केले. तर आभार जनहीत शेतकरी संघटनेचे औदुंबर गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)