नीरा उजवा कालव्यातील पाणी सोडण्याच्या आ. आवताडे यांच्या मागणीला यश

0
आ. आवताडे यांच्या मागणीला यश

पंढरपूर (प्रतिनिधी) - यावर्षी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने शेतीसाठी व जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचे खूप मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभा राहिले आहे. खरीप हंगामामध्ये पेरणी केलेल्या पिकांना पावसाने ओढ दिल्याने पाणी कमी पडत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघांमध्ये निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांनी उभ्या पिकांसाठी व जनावरांना पिण्याची पाणी उपलब्ध होण्यासाठी नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरी विकास महामंडळ पुणे अंतर्गत कार्यकारी संचालक यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

या पत्रामध्ये आमदार आवताडे यांनी पाण्याअभावी खरीप हंगामातील शेतकऱ्यांची पेरणी झालेली पिके अक्षरश: होरपळून जात आहे त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ही पशुपालकांना  कामधंदा सोडून सगळीकडे भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या या संकटामुळे शेतकरी व पशुपालक यांची दैनंदिन जीवन नियोजनामध्ये हेळसांड होत असल्याचे दिसत आहे. या सर्व बाबींचा विचार करून आ.अवताडे यांनी नीरा उजवा कालव्यातील पाण्याची मागणी केली होती.

आ आवताडे यांनी मागील चार ते पाच दिवसांपूर्वी केलेल्या या संवेदनशील मागणीची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन नीरा उजवा कालव्यातून हे पाणी मतदारसंघाच्या दिशेने सोडण्यात आले आहे. सदर पाण्याचा प्रवाह माळशिरस पर्यंत आला असून लवकरच हे पाणी पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, कोर्टी उंबरगाव, बोहाळी, खर्डी कासेगाव, तनाळी, तपकिरी शेटफळ, तावशी, एकलासपूर रांझणी, शिरगाव या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचणार आहे. नीरा उजवा कालव्यातील पाणी सोडण्यासाठी या भागातील जनतेच्या मागणीची पूर्तता आमदार समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने अखेर प्रत्यक्षात उतरली असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)