शरद पवार यांचे विश्वासू समर्थक शिवाजी पाटील यांचे निधन

0
      पंढरपूर  (प्रतिनिधी) - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे निष्ठावंत समर्थक व पंढरपूर तालुक्याच्या कृषी क्रांतीचे जनक कर्मवीर औदुंबरअण्णा पाटील यांचे विश्वासू सहकारी असणारे पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील ज्येष्ठ नेते शिवाजी बाबा  पाटील यांचे सोमवार दि. 24 रोजी सकाळी निधन झाले. ते  88 वर्ष वयाचे होते.
     त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील यांनी कर्मवीर  औदुंबरअण्णा पाटील यांच्या राजकीय वाटचालीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन शरद पवार यांच्या राजकारण व समाजकारणाला  समर्थ साथ दिली. तर शिवाजी पाटील यांनी पंढरपूर बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष यासह अनेक संस्थांचे संचालक अशी विविध पदे भूषवली.
        पोलीस अधिकारी दशरथ पाटील, रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य बाळासाहेब पाटील, संजय पाटील यांचे ते  वडील होत.  त्यांच्या  अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक  क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)