मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील निरनिराळ्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या जीवनाचे सुरक्षेतेसाठी शासन पातळीवर आवश्यक ती कार्यवाही निर्गमित करण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांचे आमदार समाधान आवताडे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मशेन मार्फत विनंती केली.
आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ सभागृहामध्ये आपली भूमिका मांडताना आ. आवताडे यांनी सांगितले की, सध्या सगळीकडे पावसाचे दिवस आहेत. पावसाळी ऋतू हा पर्यटकांच्या पर्यटन सफरसाठी अतिशय आवडता ऋतू समजला जातो. या दिवसांमध्ये अनेकजण कौटुंबिक व सामूहिक पद्धतीने राज्याच्या व राज्याबाहेरील विविध पर्यटनस्थळी पर्यटनाचा बेत आखतात. परंतु पर्यटनस्थळी गेल्यावर अनेकजण मौज-मजा करत आपल्या टूरचा मनसोक्त आनंद घेत असतात. साहजिकच असा पर्यटनीय आनंद लुटत असताना काही पर्यटक मंडळी त्यादरम्यान जीवावर बेतणारे पर्यटन मंडळी चुकीच्या पद्धतीने संकट ओढवून घेत असतात. त्यामुळे अनेकवेळा ही पद्धत अनेकवेळा पर्यटकांच्या जीवनांचा शेवट करणारे ठरले आहे.
अशा संकटसमयी पर्यटकांच्या जीवावर येणारे संकट दूर करण्यासाठी त्या त्या भागातील सुरक्षा अधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व इतर खाजगी इसम यांच्याकडून परतवून लावले जाते. परवाच पालघर येथील लिपिक पदावर कार्यरत असणारे नरेंद्र शिंदे हे पर्यटकाचा जीव वाचवत असताना त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला. असे प्रकारचे मृत्यू व उजेडात न येणारे मृत्यू यांची संख्या मोठी असल्याचेही आ. आवताडे यांनी सांगितले आहे. आ आवताडे यांच्या या विधिमंडळ भूमिकेमुळे राज्यातील अनेक पर्यटन स्थळी अनभिज्ञ असणारा संवेदनशील मुद्दा समोर आला आहे.