महिला भाविकांनी केले नदीचे पात्र व वाळवंट स्वच्छ

0
झाडू संतांचे मारग l करू पंढरीचा स्वर्ग ll

विदर्भातील ४५० महिला भाविकांनी केले नदीचे पात्र, वाळवंट स्वच्छ 

   पंढरपूर (प्रतिनिधी) -- झाडू संतांचे मारग l करू पंढरीचा स्वर्ग ll या संतउक्तीनुसार विदर्भातील ४५० महिला भाविकांनी नदीचे पात्र व वाळवंट स्वच्छ झाडून शेकडो टन कचरा गोळा केला . गुरुवार दि. ६ जुलै रोजी ह. भ. प. नामदेव महाराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी १२ वा. लाल रंगातील शेकडो महिला भाविक हातात झाडू, खराटे घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला.


     शिरपूर(जैन) ता.मालेगाव, जि. वाशिम येथील या महिला भाविक असून आषाढीवारीसाठी त्या पंढरपूर येथे वास्तव्यास आहेत. या महिलांनी संपूर्ण वाळवंट परिसर आणि नदीतील कपडे, जीर्ण व फुटलेल्या मूर्ती, देवी देवतांच्या तसबिरी काढून सफाई केली.


ह. भ. प नामदेव महाराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिंडीप्रमुख रवी पुरी यांनी या स्वच्छता मोहीमेचे नियोजन केले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)