१०० खाटांच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीला मंजूरी - आ. आवताडे

0

मंगळवेढा (प्रतिनिधी) :- मंगळवेढा शहरामध्ये असणाऱ्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ३० खाटांवरून १०० खाटांच्या रुग्णालयामध्ये करणेबाबतचा अध्यादेश आरोग्य विभागा अंतर्गत शासन मान्यतेचे पत्र आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे प्राप्त झाले असल्याची माहिती पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

मंगळवेढा शहर व तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या व तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण होण्याच्या अनुषंगाने आ. आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,  महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील तसेच आरोग्यमंत्री ना.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांचेकडे सदर रुग्णालयाच्या वाढीव खाट क्षमतेसाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार करुन ही मागणी केली होती. या वाढीव खाटांच्या भौतिक सुविधेमध्ये निरनिराळ्या आजारांवरील १४ तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्स, इतर कर्मचाऱ्यांचा  असा एकूण ३९ नवीन कर्मचारी स्टाफ, सुसज्ज्य आय. सी. यु., ऑपरेशन थिएटर, आदी जिल्हा रुग्णालय पातळीवरील असणाऱ्या सोयी या उपजिल्हा रुग्णालयात मिळणार आहेत.

त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील विविध आजारांवर उपचार घेणारे अनेक रुग्ण व तालुक्यातील जनतेची ही आरोग्य साधक मागणी आणि तालुका आरोग्य विभाग यांच्या आरोग्य सुविधेला गतिमानता प्राप्त करुन देण्यासाठी आ. आवताडे यांनी शासनपातळीवर ही मागणी ठेवली होती. तालुका आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन व देखरेखखाली अनेक मातांच्या प्रसूती, निरनिराळ्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया यासाठी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना खाट उपलब्ध न झाल्याने तासनतास उपचारासाठी ताटकळत आणि वेदना सहन करत प्रतिक्षा करावी लागत होती.

परंतु आ आवताडे यांच्या माध्यमातून वाढीव खाट मागणीच्या पूर्ततेमुळे रुग्णांच्या आरोग्य उपचार अडी-अडचणी व समस्या यांना आता पूर्णविराम मिळणार आहे. मतदारसंघातील जनतेच्या विविध धोरणात्मक विकास कामांची मालिका आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाच्या कार्य कारभारातून पूर्ण लोकप्रतिनिधी म्हणून आ आवताडे यांची जनमाणसांमध्ये विकासाभिमुख प्रतिमा आणखी जोमाने उंचावत असल्याची भावना मतदारसंघातील जनतेमध्ये ठळकपणे दिसून येत आहे.

मंगळवेढा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये १०० खाटांची उभारणी होण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आतापर्यंत शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या मागणीचे घोंगडे गेली अनेक वर्षे भिजत पडले असताना आ आवताडे यांनी यावर व्यापक दृष्टीने विचारमंथन साधून १०० खाटांच्या मागणीचे हे आरोग्यप्रेरक विकास कार्य पूर्ण केल्याने तालुका आरोग्य विभागाचा आरोग्य सेवा लौकिक आणखी समृद्ध होईल व सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी हे दालन वैभवशाली रूपामध्ये तालुक्याच्या विकासामध्ये भर पाडेल - दिगंबर यादव (सदस्य,न.पा.प्राथ.शिक्षण मंडळ मंगळवेढा)

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)