सोलापूर : राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या तब्बल ४१ बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.