अभिजीत पाटील यांचेकडून ४लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट
पंढरपूर (प्रतिनिधी) - सांगोला तालुक्यातील धाराशिव साखर कारखाना युनिट नंबर ४ची आगामी सन २०२३ ते २०२४ या सालातील गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी सोमवारी या कारखान्याचे मिल रोलर पूजन सहकार शिरोमणी कारखान्याचे मा.संचालक श्री.दिपक पवार व त्याच्या सुविद्य पत्नी सौ.मधुराताई यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी याआगामी हंगामात कमीत कमी चार लाख गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे जाहीर केले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील,जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे, चिफ इंजिनिअर श्री. सगरे, मुख्य शेतकी अधिकारी जमीर काझी, चीफ केमिस्ट श्री.आवळे ,चीफ अकाऊंट अजित घोडे, उप शेती अधिकारी सुनिल मासाळ, तसेच उपखाते प्रमुख सर्व कर्मचारी, कामगार वर्ग उपस्थित होते.
हा कारखाना बारा वर्ष बंद होता. तो अभिजीत पाटील यांनी आपल्या धाराशिव युनिट नंबर ४म्हणून आपल्याकडे घेतला. अवघ्या ३५ दिवसात बंद अवस्थेत असलेला हा कारखाना सुरू करून मागील दोन वर्ष गाळप केले आहे. हा तिसरा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे सांगोला तालुक्यासह इतर भागातील ऊस गाळपचा मोठा प्रश्न मिटणार आहे.