आषाढीत मंदिर समितीला ६ कोटी २७ लाखांचे उत्पन्न

0


गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ

    पंढरपूर (प्रतिनिधी ) - भारताची दक्षिण काशी असणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरी नगरीत  आषाढी यात्रेस आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले. श्रीविठ्ठल भक्तांनी विठुरायाच्या व रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले.   समितीच्या लाडू प्रसाद, परिवार देवता, सोने चांदी भेट, ऑनलाईन देणगी, तसेच भक्त निवास, गोशाळा आदी उत्पन्न स्तोत्रातून भरभरुन दान मिळाले आहे. 

  आषाढी यात्राकाळात  ६ कोटी २७ लाख ६० हजार २२७ रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 


श्रीविठ्ठल चरणवरील दान -४५ लाख २३ हजार २१०, श्रीरूक्मिणी चरणावरील दान —१२ लाख ६९ हजार १७३, देणगी- २ कोटी १३ लाख ८५हजार १३१, सोने दागिने - १३ लाख ३२ हजार ४७५ रुपये, हंडी पेटीतून १ कोटी ३८ लाख ८१४१, परिवार देवता –५३ लाख, ४४ हजार ११७, लाडू प्रसाद – ७२ लाख, ४२ हजार २८०, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास ३९ लाख  ७० हजार ४७९ , ऑनलाईन स्वरूपात ४२ लाख ७८ हजार ७७ , परिवार देवता ५३ लाख ४४ हजार ११७ रुपये एवढे उत्पन्न मिळाले.

गतवर्षी पेक्षा ५७ लाख ६३ हजार ४२५ रुपये जास्त उत्पन्न यंदाच्या वर्षी मंदिर समितीस प्राप्त झाले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)