पंढरपूर दि. १४ (प्रतिनिधी) : इनरव्हिल क्लबच्या नूतन अध्यक्षा सौ. अनुराधा हरिदास यांचा पदग्रहण समारंभ योगाभवन येथे माजी असोसिएशन सेक्रेटरी पी डी सी अनुराधाजी चांडक व झोनल कॉर्डिनेटर पी डी सी नगीनाजी बोहरी यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवोदित अध्यक्ष व सेक्रेटरी यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अनुराधाजी चांडक यांनी क्लबने कशा पद्धतीने समाजाभिमुख होऊन काम करावे, केलेली कामे योग्य पद्धतीने लोकांपर्यंत कशी पोचवावीत व क्लबची उंची कशी वाढवावी यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पंढरपूर येथे नवीन सुरू झालेल्या गतिमंद ( दिव्यांग ) मुलांच्या शाळेसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी देण्यात आली.
नूतन अध्यक्षा अनुराधा हरिदास यांनी सर्वांनी विश्वासाने दिलेला पदभार स्वीकारून जबाबदारीने काम करण्याची ग्वाही दिली. सेक्रेटरी अमृता आराध्ये, ट्रेझरर जागृती खंडेलवाल, आय एस ओ प्रिती वाघ, एडिटर लक्ष्मी (मुग्धा) आराध्ये, आणि सी सी सुचेता भादुले आणि सर्व क्लबच्या सदस्यामैत्रिणी यांच्या सहकार्यातून जास्तीत जास्त प्रोजेक्ट करणार असल्याबाबत आश्वासित केले.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब, इनरव्हिल पल्स क्लब, लायन्स क्लब, लायन्स ड्रीम क्लब, भारत विकास परिषद आदी समाजसेवी संस्थांचे अध्यक्ष व सेक्रेटरी व सभासद उपस्थित होते. आभार प्रदर्शन अमृता आराध्यॆ व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी जोशी आणि गौरी अंमळनेरकर यांनी केले.