महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथभाई शिंदे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने व आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या संकल्पनेतून व भैरवनाथ शुगरचे चेअरमन व शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत साहेब तसेच भैरवनाथ व्हाईस चेअरमन श्री अनिल दादा सावंत साहेब यांचा मार्गदर्शनाखाली "आरोग्याची वारी पंढरीच्या दारी" हा प्रेरणादायी व आरोग्य संपन्न असा उपक्रम पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारीच्या दरम्यान म्हणजेच 27 जून ते 30 जून या दरम्यान यशस्वीरित्या राबविण्यात आला, या उपक्रमात वारकरी, विठ्ठल भक्त, भाविक भक्त, यांनी अकरा लाख चौसष्ट हजार भक्तांनी "आरोग्याची वारी पंढरीच्या दारी " या उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी करून औषध उपचार मिळाले यासाठी आज डॉक्टर्स ,आरोग्यमित्र, आरोग्य दूत, प्रशासक, आशा सेविका, राजकीय मंडळी, तसेच सामाजिक मंडळी, पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा आज भांजे मंगल कार्यालय सोलापूर रोड माढा येथे पार पडला* यावेळेस राज्याचे आरोग्य संचालक माननीय श्री राधाकिशन पवार सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी सोनिया बागडे सोलापूर सिव्हिल सर्जन श्री धनंजय पाटील पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले तसेच सोलापूरचे प्रांत श्री सदाशिव पडदूणे साहेब तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा शिवाजीराव सावंत साहेब यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले व आपण सर्वांच्या प्रयत्नाने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असा विश्वविक्रम आरोग्य सोहळा आपण आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी तसेच भाविक भक्तांसाठी आरोग्यसेवा पोहोचवून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे कार्य आपण सर्वांनी केले याबद्दल मी आपणा सर्वांसमोर नतमस्तक होतो व आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.