पंढरपूर, दि.10 (उमाका) :- किमान समान शिबीरा अंतर्गत कवठेकर प्रशाला, पंढरपूर येथे तालुका विधीसेवा समिती मार्फत शनिवार, दिनांक १० जुलै, २०२३ रोजी विद्यार्थीं करीता मार्गदर्शक शिबीर आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी, सोलापूर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव नरेंद्र जोशी,. जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे, पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायाधीश एम. आर. कामत यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरास न्यायाधीश श्री. एम. आर. कामत यांनी मुला व मुलींना शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. मुलींना स्वतंत्र्य जीवन जगण्याचा अधिकार आहे परंतु ते जीवन जगताना दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये असे सांगितले. तसेच सदर शिबीरामध्ये मुलींच्या शिक्षणाच्या अधिकाराबद्दल महत्व सांगणारी दिग्दर्शक अमित काटकर, सांगली यांचा " खिडकी " हा लघुपट दाखवण्यात आला.
कायदेविषयक शिबीराची प्रस्तावना पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. अर्जुन पाटील व सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. एन. जी. कुलकर्णी व आभार सौ. एस. आर. कुलकर्णी यांनी केले.
कवठेकर प्रशालेचे प्राचार्य श्री. पाटील विधी सेवा समितीचे विधीस्वयंसेवक सुनिल यारगट्टीकर, अॅड.अंकुश वाघमोडे, पांडुरंग अल्लापूरकर, नंदकुमार देशपांडे, सिस्टीम ऑफिसर नईम मोमीन, न्यायालयीन कर्मचारी.के. के. शेख, विशाल ढोबळे, विवेक कणकी तसेच प्रशालेचे मुले-मुली उपस्थित होते.