या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की पूर्ण राज्यभर सुमारे चार लाखाच्या आसपास वृत्तपत्र विक्रेते असून या संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात राज्य शासनाने 7 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्याच्या समस्या त्याच्या संबंधित कल्याणकारी योजनेचा प्रस्ताव व अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त असंघटित कामगार कार्यालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट समिती घटीत करण्यात आली होती. या समितीने तयार केलेला अहवाल 17 नोव्हेंबर 2019 रोजी राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्याच्या कामाचे स्वरूप व इतर कामापेक्षा भिन्न असून त्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याचा लाभ वृत्तपत्र विक्रेत्यांना दिला पाहिजे अशी स्पष्ट शिफारस या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे. त्या प्रश्नाची अद्याप सोडवणूक नसल्याने सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना पंढरपूर शहर विक्रेता संघटना यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात व अहवालात नमूद केल्याप्रमाणे तरतूद करून वृत्तपत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून वृत्तपत्र विक्रेत्यांना व व्यवस्थेतील सर्वच घटकांना स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करून न्याय द्यावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले. गेले पंधरा दिवस झालं राज्यातील विशेषता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, बार्शी, सोलापूर आदि ठिकाणच्या वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने तेथील तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनाचा विचार न केल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.