लोकमान्यचा स्थलांतर उद्घाटन सोहळा उत्साहात
लोकमान्य सोसायटीची पंचवीस हजार कोटी पर्यंत ची उलाढाल
पंढरपूर (प्रतिनिधी) - मल्टीपर्जज सोसायटीच्या माध्यमातून बँकींग क्षेञामध्ये काम करत असतानाच इतर विविध क्षेञामध्येही लोकमान्यने मोठे काम उभारले असून हे काम सहकारी क्षेञासाठी उल्लेखनीयच आहे असे प्रतिपादन माजी आमदार व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी केले आहे.
यावेळी व्यासपीठावर दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, लोकमान्यचे संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, चिफ को कॉर्डीनेटर विनायक जाधव, तरुण भारत संवाद,सोलापूरचे आवृत्ती प्रमुख विजय देशपांडे, उपसंपादक श्रीशैल भद्रशेट्टी, सांगली शाखेचे विभागीय अधिकारी सुदत्त पाठक, सहाय्यक विभागीय व्यवस्थाक प्रदिप पाटील, व्यवस्थापक सुभाष मोरे, सोलापूर शाखा व्यवस्थापक सुभाष भडगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते फित कापून स्थलांतरित शाखेचे उद्घाटन,स्टेशन रोड येथील राजलक्ष्मी मार्केटमध्ये शुक्रवार दि. २८ जुलै रोजी सकाळी करण्यात आले. कार्यक्रमास विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भेट दिली.
पुढे बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की, पंचवीस हजार कोटी पर्यंतची उलाढाल, ७ हजार पाचशे कोटी पर्यंतच्या ठेवी, आणि दोनशे तेरा शाखा अशी नेत्रदीपक प्रगती करीत सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेली लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी असून अशक्य वाटावा असा व्यवसाय या बँकेने केला आहे, ग्राहकांशी विनम्र सेवा, आणि सचोटी या बळावर लोकमान्य सोसायटी पंढरपूर शाखा निश्चितच कौतुकास्पद कामगिरी करीत आहे. लोकमान्य ग्रुप शिपिंग,बँकिंग, शेअर बाजार, खाजगी विमानसेवा आदी क्षेत्रात उत्तम प्रगती करीत आहे. यानंतर मंगळवेढा येथील श्री दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व अमोल रणदिवे यांनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या या प्रगतीचे कौतुक केले.
______________________________
लोकमान्यचा महाराष्ट्रभर पसार
लोकमान्य मल्टीस्टेटची शाखा स्थलांतरित होऊन दर्शनीय भागामध्ये स्थलांतरित झाल्याने याचा मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोप-यातून आलेले भाविक याच मार्गावरून दर्शनासाठी विठ्ठल मंदिराकडे जातात. यावेळी या भाविकांशी या सोसायटीच्याबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात या सोसायटीची माहिती भाविकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरणार आहे.
- गजानन धामणेकर
______________________________
लोकमान्यची ग्राहकांच्या घरापर्यंत सेवा
सीमाभागातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी, उद्योग व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे या हेतूने लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी सुरू करण्यात आली. गेल्या २७ वर्षात आंतरराज्य दर्जा मिळविला. कोविड काळात आपत्कालीन व्यवस्थेला आर्थिक मदत दिली. दैनिक तरुण भारतचे संस्थापक स्व.बाबुराव ठाकूर हे महात्मा गांधीचे अनुयायी होते.त्यांनी दुर्गम भागात शाखा सुरू केल्या. स्व. बाबुराव ठाकूर यांची शिकवण लोकमान्य मल्टीपर्पजचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी पुढे नेली. चंदगड सारख्या तालुक्यात १८० शाखा बेळगाव येथे सायन्स अँड आर्टस कॉलेज सुरू केले. युवा उद्योजक प्रसाद ठाकूर विविध उद्योग क्षेत्रात भरारी घेत आहेत. बँकेच्या २१३ शाखा ग्राहकांना घरापर्यंत सेवा देत आहेत.
- पंढरी परब
______________________________
यावेळी सांगली, सोलापूर येथील अधिकारी ,कर्मचारी यांच्यासह पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक सागर राहिरकर, श्रीपाद पोतदार, आकाश वाडेकर, अनंता देवकर व तरुण भारत संवादचे संतोष रणदिवे, दादासाहेब कदम, अतुल फराटे, चैतन्य उत्पात, विनोद पोतदार आदी उपस्थित होते. लोकमान्य मल्टिपर्पज बँकेचे कॉर्डीनेटर विनायक जाधव व डीएमआर फाऊंडेशन महाराष्ट्रचे अमोल रणदिवे यांनी सूत्र संचलन केले.विभागीय व्यवस्थापक सुदत्त पाठक यांनी आभार मानले.