अधिक मासानिमित्ताने अनुराधा पौडवाल यांची विठूराया चरणी स्वरपूजा

0

      पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने अधिक मासानिमित्ताने विठ्ठल सभा मंडपात महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका  अनुराधा पौडवाल आणि चंद्रशेखर महामुनी यांची विठूराया चरणी स्वरपूजा संपन्न झाली.
        सुरुवातीला त्यांनी वारकरी बीजमंत्र जय रामकृष्ण हरी यांनी सुरुवात करत सुंदर ते ध्यान, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, देव माझा विठू सावळा, सर्वांच्या मुखात असलेलं विठूरायाच नाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला गात असताना उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देत विठ्ठल सभा मंडप दुमदुमून गेला, त्यानंतर चल ग सखे चल ग सखे पंढरीला, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अशी सुंदर अभंगरचना गाऊन रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले,त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत निनाद पुणे यांच्या वतीने तबला गिरीश महामुनी, ढोलक केदार मोरे, रिदम ऋतुराज कोरे, ताल महेंद्र फुलपाखरं, सिंथेसाईजर अमन सय्यद,आणि बासरी सचिन वाघमारे यांनी अप्रतिम केली, यावेळी पंढरपूर मधील संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)