भारत सेवाश्रम संघाच्या वैद्यकीय पथकाचे काम प्रेरणादायी - पुदलवाड

0
पंढरपूर (प्रतिनिधी) - भारत सेवाश्रम संघाच्या वैद्यकीय पथकाचे काम प्रेरणादायी आहे. वारकरी यांना सेवा देणेचे महत्वपुर्ण काम भारत सेवाश्रम संघाचे स्वयंसेवकांनी केले आहे असे मत मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले. 
श्री विठ्ठल मंदिरा समोरील दर्शन मंडपात आज भारत सेवाश्रम संघाने आषाढी कालावधीत सेवाकार्य केले. या सेवाकार्यात सहभागी स्वयंसेवकांना मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार यांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप करणेत आले.
या प्रसंगी स्वामी भास्करानंद, स्वामी प्रभाकरानंद , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, समन्वयक शरद अमृते प्रमुख उपस्थित होते.
या प्रसगी बोलताना व्यवस्थापक बालाजी पुदलवाड म्हणाले, गेल्या ३० वर्षापासून भारत सेवाश्रम संघाचे स्वयंसेवक सेवाकार्य करत आहेत. वैद्यकीय पथकाबरोबर दर्शन रांग, व आवश्यक पडेल तिथे काम करतात. यामुळे मंदिर समितीला खुप मदत होते. 
गर्दीच्या ठिकाणी सेवाकार्य होत असलेमुळे भाविकांना चांगली मदत होते. 
या प्रसंगी संस्थानचे राजाभाऊ चोपदार यांनी भारत सेवाश्रम संघाच्या
सेवा कार्याबद्दल गौरव केला. आळंदी येथे अशा प्रकारचे सेवाकार्य सुरू करणेची विनंती केली. 
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी आपल्या मनोगता मधून १९९६ पासून भारत सेवाश्रम संघाचे कार्य सांगितले. स्वामी विश्वात्मानंद, डाॅ. संजीव महाराज यांनी हे सेवाकार्य अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये सुरू केले. भाविकांना २४ तास सेवा देण्याचे काम केले. आपण स्वतः या सेवाकार्यातून पुढे आलो असल्याचे सांगून भारत सेवाश्रम संघाचे कार्य देशांबरोबर विदेशात देखील असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले. 
स्वामी भास्करानंद यांनी स्वामी प्रणयानंद यांचे जीवनकार्य सांगून देशात कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेत भारत सेवाश्रम संघाचे स्वयंसेवक वेळेत पोहचून सेवाकार्य देत असल्याचे सांगितले. या प्रसंगी डॅा. विलास कुलकर्णी, डॅा.अमित निकुंभ, डॅा. विनोद वालावलकर, डॅा. अन्मेश अमदोसकर, डॅा. राजेश पांडे, डॅा. राकेश राजावाणी,  डॅा. प्रविण माळी, डॅा. दक्ष गापळे, डॅा.भाग्यश्री जाधव, डॅा. तेजस्वी अमरूले, डॅा. नितीन पाटील यांचा या प्रसंगी गौरव करणेत आला. 
या प्रसंगी डॅा. विलास कुलकर्णी, डॅा.अमित निकुंभ, डॅा. विनोद वालावलकर, डॅा. अन्मेश अमदोसकर, डॅा. राजेश पांडे, डॅा. राकेश राजावाणी,  डॅा. प्रविण माळी, डॅा. दक्ष गापळे, डॅा.भाग्यश्री जाधव, डॅा. तेजस्वी अमरूले, डॅा. नितीन पाटील,डॅा. राम कारे, डॅा. प्रदीप आंग्रे यांनी वैद्यकीय पथकात काम केले बद्दल त्यांचा गौरव करणेत आला. या सेवा कार्यात स्वयंसेवक नोबेंद्र शहा, असीम भौमी, सौमित्र दुलाई, प्रल्हाद खा यांनी सेवा कार्यात दिलेले योगदाना बद्दल मुकेश यांचे स्मरणार्थ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सुत्रसंचालन शरद अमृते यांनी केले. स्वामी प्रभाकरानंद यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)