सोलापूर - दि १७/०७/२३ रोजी रात्रौ ०२/०० वाजण्याचे दरम्यान ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आढीव गावा मध्ये CMIS अँप वर आरोपी चेक करीत असताना इसम नामे १) दादा उर्फ गोपाळ माणिक दावणे, वय ३० वर्षे २ ) रंभाजी पांडुरंग गोरे, वय ३० वर्षे दोघे रा. आढीव ता. पंढरपूर हे मिळून आले असता cmis अँप वर ते कामती पोलीस ठाणे गुर नं ४६ / २०१९, भादवि कलम ३९९ मधील आरोपी असल्याचे समजल्याने कामती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना संपर्क करून खात्री केली असता त्यांचेवर कामती पोलीस ठाणे ४६ / २०१९ भादवि कलम ३९९ मध्ये पाहिजे असल्याचे सांगितले असता वर नमूद आरोपी यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून कामती पोलीस ठाणे पथकाचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी ही श्री अर्जुन भोसले, मा उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, श्री मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शन खाली श्री बाळासाहेब माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पथक पोना / विनायक क्षीरसागर, पोना पोना / नितिन माळी, पोहवा ननावरे, पोकॉ/ विकास हजारे, पोका गायकवाड यांनी ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान सदरची कामगिरी पार पाडली आहे.