अमोल मुडे (ME) वर्षा चवरे (E&Tc) अल्ताफ शेख (E&Tc) आकाश घाडगे (E&Tc)
कोर्टी (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक मधील चार विद्यार्थ्यांची L&T DEFENCE पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली असून त्यांना वार्षिक पॅकेज 2.20 लाख रुपये असून त्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली.
न्यु सातारा पॉलीटेक्निक महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे . विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण प्रणाली, उच्चशिक्षित व शिस्तप्रिय अनुभवी प्राध्यापक वर्ग, जगातील नामवंत कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोकऱ्या, न्यु सातारा पॉलीटेक्निकचा उत्कृष्ट निकालवर भर , विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवत असते.
महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या या परिश्रमामुळेच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम निकम साहेब, संस्थेचे प्रतिनिधी शेडगे साहेब, प्राचार्य विक्रम लोंढे सर, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड सर, सर्व विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.