न्यू साताऱ्याच्या विद्यार्थ्याची Mahindra Pvt. Ltd. Pune या कंपनीत निवड.

0
 

    कोर्टी (प्रतिनिधी) - येथील न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये घेतलेल्या मुलाखतीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्याची Mahindra Pvt. Ltd. Pune या कंपनीत निवड झाली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब यांनी दिली.

Mahindra Pvt.Ltd.Pune या कंपनीने न्यु सातारा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्याची निवड केली.

न्यु सातारा पॉलीटेक्निक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या टेक्निकल स्किल, सॉफ्टवेअर स्किल, कम्युनिकेशन स्किल यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या कंपन्यांमध्ये वाढत चाललेली दिसून येत आहे. त्यामुळे नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत असल्याने पालकांचा न्यू सातारा पॉलिटेक्निक वरचा विश्वास आणखीन दृढ होत चालल चालला आहे.

न्यु सातारा पॉलीटेक्निक ने हाच पालकांचा विश्वास जपत व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करत प्लेसमेंट कडे अधिक भर दिला आहे आणि याचाच परिणाम म्हणून महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी कॅम्पस मुलाखतीतून निवड होऊन स्वतःचे भविष्य घडवीत आहेत.

त्यांच्या याच यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाराम निकम साहेब व संस्थेचे प्रतिनिधी शेंडगे साहेब प्राचार्य विक्रम लोंढे सर उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड सर सर्व विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)