शिवसेना विधानसभा-लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांच्या प्रयत्नाला यश
पंढरपूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील कोर्टी या गावाला एम आर जी एस या योजनेअंतर्गत 15 लाख रुपये निधी मंत्री महोदय श्री. संदिपान भुमरे यांना पत्र देऊन कोर्टी ग्रामपंचायत कोर्टी गावच्या विकासासाठी पंधरा लाख रुपये देण्यात आले आहेत, शिवसेना विधानसभा लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला, या 15 लाखांमध्ये कोर्टी गाव अंतर्गत पेवर ब्लॉक पेमेंट रस्ता करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे, महेश नाना साठे यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून कोर्टी गावचे उपसरपंच महेश येडगे यांनी हा निधी कोर्टीगावच्या विकासासाठी आणला आहे,
पेवर ब्लॉक व सिमेंट काँक्रीट रस्ता उत्तम प्रतीचा करून कोर्टी गावच्या विकासासाठी अधिक निधी मंजूर करून आणू असे आश्वासन महेश येडगे यांनी दिले. कोर्टी गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाल्याबद्दल कोर्टी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.