कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण सप्ताहानिमित्त मोफत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर

0

          पंढरपूर (प्रतिनिधी) :- कर्मयोगी श्रध्देय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण सप्ताहानिमित्त श्री.सत्यविजय मोहोळकर यांनी वार्ड क्र.7 मधील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी शिबीर आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन श्री.प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते झाले.तर प्रतिमापुजन श्री.लक्ष्मण भाऊ शिरसट यांचे हस्ते करण्यात आले.

        यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले, अनेक कुटुंबावर आजारपणात आर्थिक संकट येत असते, त्यावेळेस त्या कुटुंबाला मदतीची गरज असते ही गरज ओळखून सरकारने आयुष्यमान हेल्थ कार्ड काढले आहे. यामध्ये कुटंबासाठी 5 लाख रूपये पर्यत मदत होणार आहे. त्याचे काही नियम व अटी आहेत. त्यासाठी ज्यावेळेस आपला पेशंट हॉस्पीटलला अ‍ॅडमिट करतो त्यावेळेस लगेच या कार्डची नोंदणी करणे आवश्यक आहे. हे केल्यानंतर त्यांच्या नियमाप्रमाणे तुम्हाला या कार्डचा फायदा मिळणार आहे.  यामध्ये पंढरपूरात जवळपास आठ नामांकित हॉस्पीटल आहेत.

        सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला जर किडणी,अ‍ॅटॅक,लिव्हर,मेंदुरोग असेजर मोठ्या रोगांचे निदान झाले सर्वसामान्य कुटुंबाला यातून सावरायला खुप वेळ लागतो,त्यामुळे आयुष्यमान हेल्थ कार्ड काढले तर त्यांचा आधार मिळतो.

    सदर कार्यक्रमास नगरसेवक लक्ष्मण शिरसट, रा.पां.कटेकर, सतिश मुळे, इब्राहीम बोहरी, संजय निंबाळकर, बसवेश्‍वर देवमारे, बशीर तांबोळी, अनिल अभंगराव, रमेश कांबळे, कल्याणराव कोले, जवंजाळ, नगरसेविका सविता मोहोळकर, व वार्ड क्र.7 मधील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कॅम्प प्रमुख राजेश जावडेकर यांनी बहुमल्य सहकार्य केले. 

     आज हे  शिबीर सत्यविजय मोहोळकर यांनी घेऊन स्तुत उपक्रम केला आहे.  सदर कार्यक्रमात जवळपास 450 नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला सकाळी 10 वाजलेपासून सायं 6 पर्यत या कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यविजय मोहोळकर यांनी तर आभार प्रदर्शन विशाल आर्वे यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)