लायन्स क्लब ऑफ सांगोला नूतन पदाधिकाऱ्यांचा आज पदग्रहण व शपथविधी

0
       सांगोला (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ सांगोला लायन  वर्ष २०२३-२४ साठी अध्यक्षपदी ला. उन्मेश आटपाडीकर, सचिवपदी ला.अजिंक्य झपके व खजिनदारपदी ला. नरेंद्र होनराव यांची निवड झाली असून आज बुधवार दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी  येथील कविराज मंगल कार्यालय महूद  रोड सांगोला येथे सायंकाळी पाच वाजता पदग्रहण व शपथविधी समारंभ संपन्न होत असल्याची माहिती माजी अध्यक्ष ला. प्रा. धनाजी चव्हाण यांनी दिली. पदप्रदान अधिकारी ला. विजयकुमार राठी प्रांतपाल ३२३४ड१ (२०१४-१५), नुतन सदस्य शपथप्रदान अधिकारी ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके प्रांतपाल ३२३४ड१(२००९-१०) यांच्या शुभहस्ते व ला. राजेंद्र शहा कांसवा रिजन चेअरमन ,ला.प्रा.धनाजी चव्हाण झोन चेअरमन यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. समाजाला प्रेम आणि विश्वास  देऊन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विभागात सेवाभावी वृत्तीने विधायक काम करणारी जगातील १६६ अधिक स्वतंत्र देशात २८ हजार ५०० पेक्षा जास्त शाखा असणाऱ्या लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रांत ३२३४ ड१  माजी प्रांतपाल  प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक अभुदयासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या संघटनेचे अध्यक्षपदी पदभार घेताना मला मनस्वी आनंद होत आहे.  लायन्स क्लब सांगोला  माध्यमातून सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक विकासासाठी खूप चांगले कार्य झाले आहे. यापुढे याच पद्धतीने अविरतपणे कार्य होणार असल्याचे नूतन अध्यक्ष यांनी सांगितले.

या पदग्रहण समारंभानिमित्त लायन्स  क्लब सांगोला व लवटे ऑर्थोपेडीक  हॉस्पिटल सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने हाडातील ठिसूळपणा तपासणी शिबिर ला.यतिराज सुरवसे निवासस्थान खारवटवाडी येथे  दुपारी २ ते ५ या वेळेत संपन्न होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन डॉ. सुनील लवटे यांच्या शुभहस्ते ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली व झोन चेअरमन ला.प्रा. धनाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे .तरी सांगोला शहर व परिसरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब सांगोला कडून  करण्यात आले आहे..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)