बालाजी दर्शनासाठी सोलापूरकरांना रेल्वेची भेट

0
आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि सोमवारी ही गाडी धावणार

         सोलापूर (प्रतिनिधी) - मध्य रेल्वेकडून दक्षिण भारतासाठी आणखी एक रेल्वे सुरू करण्यात आली. 'एलटीटी वेलकन्नी' ही नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. ही नवी एक्स्प्रेस आता सोलापूरमार्गे धावेल. सोलापूरहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आता सुखाचा होणार आहे.
        या एक्स्प्रेसमुळे तिरुपती (चेन्नई) येथे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि सोमवारी ही गाडी धावणार आहे. दरशनिवारी दुपारी एक वाजता मुंबईहून ही गाडी सुटणार आहे. पुण्यात दुपारी चार वाजून ५५ मिनिटांनी या एक्सप्रेसचा थांबा असणार आहे. सोलापूर रेल्वे स्थानकात संध्याकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी रेल्वेचे आगमन होईल.

          सोलापूर, धाराशिव, कलबुर्गी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक तिरुपतीला जातात. तिरुपतीला जाणाऱ्या दैनंदिन सर्वच गाड्या हाऊसफुल असतात. मात्र, या नवीन गाडीमुळे सोलापूरकरांची सोय होणार आहे. या एक्स्प्रेसमुळे तिरुपतीचा प्रवास आरामदायी होणार आहे.

        दरम्यान, सध्या सोलापूर ते तिरुपती  जाण्यासाठी रोज एक गाडी आहे. यात आणखी एका गाडीची भर पडली. सोलापूरहून  तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने हा  निर्णय घेतला.

        सध्या सोलापूर ते तिरुपतीसाठी (०१४३७०१४३८) ही गाडी धावत आहे. सोलापूर शहरातून दररोज १ हजारांहून अधिक भाविक बालाजी दर्शनाला तिरुपतीला जातात. त्यामुळे या मार्गावर धावणारी तिरुपती, चेन्नई, मदुराई या तीन गाड्या तिकिटासाठी वेटिंगच असतात. त्यामुळे तिरुपतीला जाणाऱ्या गाड्या हाउसफुल्लच असतात. जास्त अंतर, कमी खर्चात प्रवास अन् दर्शन होत असल्याने अनेकजण रेल्वेचाच पर्याय निवडतात.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)