'आपलं आरोग्य व आपला विश्वास' या धर्तीवर सेवा देण्यासाठी डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटल सज्य
पंढरपूर (प्रतिनिधी) -- पंढरपूर व पंचक्रोशीत महिला रुग्णांच्या सेवेसाठी मागील दोन वर्षांपासून ‘डॉ.बी.पी.रोंगे हॉस्पिटल’ च्या माध्यमातून आरोग्यासंबंधी सेवा बजावत असताना 'महिलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आपण कटिबद्ध आहोत.' असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे यांनी केले.
पंढरपूर व पंचक्रोशीत आपल्या रुग्णसेवेने अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटलच्या या ‘मोफत वंध्यत्व निवारण शिबिरा’मध्ये सोलापूरातील ‘अपोलो फर्टिलिटी’च्या डॉ.मीनल चिडगुपकर यांनी महिला रुग्णांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या व यावरील उपचारांबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. या वंध्यत्व निवारण शिबिराच्या माध्यमातून महिलांनी घ्यावयाची काळजी व वयानुसार कशा प्रकारचे उपचार करावे? याबद्दलही त्यांनी मोफत सल्ला व मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णांची रक्त तपासणी व इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या .
या शिबिरात ५० जोडप्यांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला.या ‘वंध्यत्व निवारण शिबिर’ यशस्वी करण्यासाठी मखनुर, शहापुरे, भाग्यश्री सोनकंटले, सचिन ढोपे, अबू कलाम अन्सारी, तसेच डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटलचे व ‘अपोलो फर्टिलिटी’ चे कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.