महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विठ्ठल परिवाराच्या वतीने महिला सफाई कामगारांचा सन्मान
पंढरपूर :- पंढरपुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विठ्ठल परिवाराच्या वतीने शिवतीर्थ येथे तीर्थक्षेत्र पंढरपूर स्वच्छ आणि निरोगी ठेवणाऱ्या महिला सफाई कामगारांचा संपूर्ण पोशाख देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.
मनसे नेते मा. दिलीप धोत्रे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सोलापूरचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, समता परिषदेचे नेते जयंत भंडारे, डी एस एस चे अध्यक्ष दिलीपराव देवकुळे, माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय बंदपट्टे, माजी नगरसेवक लखन चौगुले, मनसे व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले, शहराध्यक्ष संतोष कवडे, सागर देवकुळे, गुरु दोडिया, किशोर खिलारे, मनसे शहर उपाध्यक्ष गणेश पिंपळनेरकर शेकडो महिला सफाई कामगार, पदाधिकारी उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र पंढरी स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या सफाई कामगारांचा सन्मान करून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी समाजातील दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. आजही सफाई कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मी तर सफाई कामगारांना अद्याप हक्काचे घर मिळाले नाही. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन सोलापूरचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
गेली पंधरा वर्षे झाले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी सात वर्षांपूर्वी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तयार केला आहे. आज तो पुतळा धूळखात पडून आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडे लोकशाहीर यांचा पुतळा बसवण्याची इच्छाशक्ती नाही. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यानंतर स्थानिक नेत्यांच्या पुतळ्याचे प्रस्ताव मंजूर झाले. त्या कामासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला. मात्र अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यापुढे सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना साकडे घालणार असल्याचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष दिलीप देवकुळे यांनी आपले विचार व्यक्त केले.
पुढील वर्षी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यांच्या स्मारकामध्ये होणार.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी जाहीर केली दहा लाख रुपयांची देणगी
पंढरपूर मधील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न अनेक वर्ष झाले प्रलंबित आहे. हा पुतळा उभारून तिथे स्मारक उभे करण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दहा लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. तसेच सर्व अनुयायांना घेऊन एका वर्षात नियोजित ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे यतोचित स्मारक उभारण्यात येईल. आणि त्याच ठिकाणी पुढील वर्षी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करू असे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थित आणि टाळ्याच्या गजरात स्वागत केले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे ,मनसे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले, दलित स्वयंसेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे, नगरसेवक नागेश भाऊ यादव, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण राज घाडगे, नगरसेवक लखन चौगुले, नगरसेवक शिवाजी मस्के, नगरसेवक मोहम्मद उस्ताद ,सतीश आप्पा शिंदे, उपजिल्हाध्यक्ष महेंद्र पवार, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, उप शहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गुरु दोडिया, एडवोकेट किशोर खिलारे इत्यादी उपस्थित होते.