सुमारे एकूण 24 कोटी कामापैकी एक कोटी 72 लाख रुपयाच्या कामाचा लोकार्पण शुभारंभ प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. गेले अनेक दिवसापासून प्लॉट धारक एरियामध्ये विकास कामे झाली नव्हती या कामाची वारंवार ओरड व काहींनी केलेला पाठपुरावा लक्षात घेऊन माजी आमदार प्रशांत परिचारक लक्ष्मी टाकळी सरपंच विजय माला वाळके उपसरपंच संजय साठे आदींनी या लोकार्पण व नियोजित भूमिपूजन कामाचा शुभारंभ टाकळी व टाकळी परिसरात प्लॉट धारक एरियात करण्यात आला.
प्रतिभाताई परिचारक नगर या भागातील परिसरातील नागरिकांची रहिवाशांची गेल्या अनेक दिवसाची नळ पाणीपुरवठा योजना, रस्ता खडीकरण करणे व ड्रेनेज ओढा बंदिस्त ड्रेनेज आधी कामे मंजूर केले. या कामाकरता प्रतिभाताई परिचारक नगर मधील ड्रेनेज करता 7600000. नळ पाणीपुरवठा योजने करता 367000. तसेच रस्ते खडीकरण याकरता 100000. एवढा निधी मंजूर केल्याबद्दल सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मिलिंद देवल ग्रामपंचायत सदस्य, सागर सोनवणे माजी सरपंच, अनिल सोनवणे, अकबर अत्तार, जानकर, शिंदे, उपसरपंच संजय साठे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम लक्ष्मी टाकळी येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी लक्ष्मी टाकळीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य नागरिक अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.