आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य मदत

0
       मंगळवेढा (प्रतिनिधी) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील नागेश हरी जाधव  यांच्या किडनी प्रत्यारोपण उपचारासाठी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आरोग्य उपचारासाठी अर्थसहाय्य रूपामध्ये २लाखांची मदत प्राप्त झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  नागेश जाधव यांच्यावर जहांगीर हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर पुणे येथे किडनी प्रत्यारोपण उपचार सुरू आहेत. परंतु जाधव यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने सदर आजारावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी जाधव परिवारातील सदस्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधला.

आमदार आवताडे यांनीही जाधव परिवारास उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयामार्फत मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीसाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार करून नागेश जाधव यांना उपचार होणेकामी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या प्रयत्नांतून नागेश हरी जाधव यांच्या शासकीय बँक खात्यावर दोन लाख रुपयांची आरोग्य मदत जमा झाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)