पंढरपूर (प्रतिनिधी) - भारताच्या संगणक प्रणालीचे जनक, देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती शहर काँंग्रेसच्यावतीने सदभावना दिन म्हणून साजरी करण्यात आली.
प्रारंभी प्रतिमेेचे पूजन जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. जेेष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष बजरंग बागल, शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी स्व. राजीव गांधी यांच्या कार्याबद्दलची माहिती दिली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, तालुकाध्यक्ष हणमंत मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, शंकर सुरवसे, बाबा चव्हाण, शहराध्यक्ष संदिप शिंदे, जेष्ठ नेते नागन्नाथ अधटराव, मिलिंद आढवळकर, पै. द. बडवे, मामासाहेब फलटणकर, देवानंद इरकल, शशिकांत चंदनशिवे, नागेश मिसाळ, दयानंद आटकळे, शिवकुमार भावलेकर यांच्यासह काँग्रेस अंंतर्गत विविध कमिटी, सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.