पंढरपूर (प्रतिनिधी) - शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की, पंढरपूर शहरास पाणीपुरवठा करणा-या बंधा-याची पाणीपातळी कमी झाल्याने शहरास दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने दि.26-8-2023 पासून रेल्वे रुळाच्या खालील भागात व दि. 27-8-2023 रेल्वे रुळाच्या वरील भागात एक दिवसा आड पाणीपुरवठा होईल.
याची नागरिकांनी नोंद घेऊन पाण्याचा वापर कटकसरीने करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे. असे मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.