मंगळवेढा (प्रतिनिधी) - शहर व परिसरात होऊ घातलेली अतिक्रमण मोहीम स्थगित करण्यात आली आहे. मंगळवेढा शहरातील छोटे मोठे दुकानदार कोरोना महामारीनंतर व्यापार पेठ उध्वस्त झाली होती; त्यातच लांबलेला पाऊस आणि आता येणारे राखी पौर्णिमा श्रावण पोळा गणेशोत्सव नवरात्र महोत्सव व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे सण असताना ही मोहीम करण्याचे योजले होते. परंतु या अतिक्रमण मोहीम संदर्भात आमदार समाधान दादा अवताडे तेलंगाना मध्ये असताना सुद्धा त्यांनी नगर पालिका प्रशासक, उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मोहीम स्थगित करण्याचा सक्त सूचना देण्यात आल्या.
याची दखल घेऊन प्रशासनाने दिनांक 25 ऑगस्ट रोजी होऊ घातलेले अतिक्रमण मोहीम स्थगित केली आहे. परंतु एसटी स्टँड परिसर व इंग्लिश स्कूल परिसर या परिसरातील काही विक्रेत्यांनी या मोहिमेची धास्ती घेऊन स्वतःहून अतिक्रमणे काढली होती. परंतु काल रात्री उशीर पर्यंत झालेल्या संबंधित प्रशासन अधिकारी यांना आमदार महोदयांनी अतिक्रमण मोहिमे स्थगित करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार हे अतिक्रमण मोहीम स्थगित करण्यात आली आहे. येणारे सणासुदीचे दिवस पाहता ही मोहीम स्थगित झाल्यामुळे छोटे व्यवसाय करणारे यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.