गैरहजर डॉक्टर, रुग्णांची हेळसांड,स्वच्छतेचा बोजवारा याकडे वेधले प्रशासनाचे लक्ष
पंढरपूर (प्रतिनिधी) - उपजिल्हा रुग्णालय म्हणजे समस्यांचे आगार असाच अनुभव या शहर तालुक्यातील अनेकांना येथे उपचारासाठी अथवा तपासणी साठी गेल्यानंतर आल्याचे दिसून येते.राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर नामदार तानाजी सावंत यांनी तातडीने या रुग्णालयास भेट देत येथील व्यवस्थेची पाहणी केली होती.त्यावेळीही अनेकांनी त्यांच्या समोर इथल्या असुविधांचा पाढा वाचला होता.तर १५ दिवसात सारे सुरळीत होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती.या घटनेस आर्तव वर्ष उलटून गेल्यानंतरही येथील अनेक प्रश्न आणि समस्या आजतागायत कायम असून नुकतेच युवक कॉग्रेसने या बाबत जिल्हाधिकारी सोलापूर व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देत येथे असलेला स्वछतेचा अभाव, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना सिझेरियनसाठी केला जाणारा आग्रह, रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाण्याचा दिला जाणारा सल्ला, डॉक्टर्स वेळेवर उपस्थित न राहणे, येथील कर्मचारी विशेषतः नर्सिग स्टाफकडून रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक याना निंदनीय भाषेचा वापर करणे आदी अनेक बाबीकडे लक्ष वेधत कारवाईची मागणी केली होती.
युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंढरपूर युवक कॉग्रेसचे वतीने शहराध्यक्ष संदीप शिंदे तसेच प्रमुख उपस्थित काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, जेष्ठ नेते देवानंद इरकल, जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ उराडे, शहर उपाध्यक्ष सागर कदम, सेवादल शहराध्यक्ष गणेश माने, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा उपाध्यक्ष सोमनाथ आरे, उपाध्यक्ष शिवकुमार बाहुलेकर, शशिकांत चंदनशिवे, समाधान पोळ, दत्ता डोळसे, सागर पोरे, सचिन शिंदे, सुरज शिंदे व पदाधिकारी यांनी या रुग्णालयात फेरफटका मारत अनेक बाबीकडे लक्ष वेधले. यावेळी येथील अधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली.