पंढरपूर (प्रतिनिधी) :- पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते असणारे स्वर्गीय श्रीमंत सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त यांच्या प्रतिमेचे पूजन करताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी बोलताना नगरसेवक संजय निंबाळकर यांनी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे कार्य म्हणजे ते दूरदृष्टी असलेले नेते होते. सुधाकरपंत म्हणजे जनसामान्यांचे आधारवड होते. सर्वसामान्यांच्या तसेच अनेकांच्या हृदयातील दैवत आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेले कार्य अलौकिक असून त्यांचे स्मरण पुढील पिढीपर्यंत स्मरणात राहण्यासारखे आहे.
Bbस्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त त्यांचे सहकारी भगवानभाऊ लखेरी यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित नगरसेवक संजय निंबाळकर, इकबाल बागवान, लक्ष्मण दावले, आंबादास सासवडकर, राजू पवार, सिकंदर बागवान, हरिभाऊ माने, ज्योतिराम लिंगे, दत्तात्रय शिरसट,अमर गायकवाड, केदार सुडके, पत्रकार रफिक अत्तार, पिंटू देवकर, धनंजय निंबाळकर, हृषिकेश निंबाळकर, अक्षय निंबाळकर, माऊली निंबाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.