सांगोला लायन्स क्लबचे सेवाकार्य समाजाच्या हिताचे - ला. विजयकुमार राठी

0
शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

       सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला लायन्स क्लबचे मार्गदर्शक माजी प्रांतपाल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या आचार विचाररापाठीमागे समाजाचा अभ्युदय असल्याने लायन्स क्लब ऑफ सांगोलाकडून  आजवर व लायन वर्ष २०२२-२३ मध्ये समाजाच्या हिताचे खूप मौलिक कार्य झाले आहे.व ते इतरांना प्रेरणा देणारे आहे.असे प्रतिपादन ला.विजयकुमार राठी यांनी केले येथील कविराज मंगल कार्यालमध्ये  लायन्स क्लब ऑफ सांगोला ला. वर्ष २०२३-२४ नूतन पदाधिकारी शपथविधी व पदग्रहण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये पदप्रधान अधिकारी म्हणून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर नूतन सदस्य शपथप्रदान अधिकारी ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, रिजन चेअरमन ला.राजेंद्र शहा कांसवा,सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.  

     पुढे बोलताना ला.राठी यांनी सांगोला लायन्स क्लब कडून घेण्यात आलेली नेत्र शिबिरे त्यातून झालेल्या शस्त्रक्रिया, झपके सरांनी लायन्स हॉस्पिटलसाठी  दिलेली पाच गुंठे जमीन, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारापेक्षा जास्त संख्येने होणारे रक्तदान शिबिर व क्लब कडून विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा उल्लेखनीय कार्यासाठी वेळोवेळी झालेला गौरव याचा उल्लेख करत ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, क्लबचे  पदाधिकारी व सदस्य यांचे कौतुक केले व  या कार्याला  प्रमाण मानूनच प्रांतस्तरावरील  झोन चेअरमनपद अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांना मिळाले असे सांगत त्यांचे अभिनंदन केले. व त्यानंतर ला.वर्ष २०२३-२४ नूतन अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर, सचिव ला.अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेद्र होनराव व संचालक मंडळास पदाचे महत्त्व,  जबाबदारीची जाणीव आपल्या विवेचनातून करून दिली व पदग्रहणाची शपथ दिली.
   यावेळी रिजन चेअरमन राजेंद्र शहा कांसवा, झोन चेअरमन प्रा.धनाजी चव्हाण यांनी प्रांताच्या नियोजनानुसार राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमासाठी आवश्यक सहकार्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगत नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
       नूतन अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला खूप चांगले कार्य करत आहे, या क्लबच्या अध्यक्षपदाचा पदभार घेताना मला मनस्वी आनंद होतो आहे असे सांगत आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब संघटना आणि त्यांचे कार्य नेहमी आपणास वेगळी अनुभूती देणारे आहे.यापुढे हे कार्य सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त  केला. 
या कार्यक्रमासाठी  लायन्स क्लब इचलकरंजी क्लबचे  रमेश कित्तोरीला, सोलापूर क्लबचे सुरेश जैन,विद्यामंदिरचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते,आटपाडीकर कुंटुबिय  लायन्स क्लब ऑफ  सांगोला पदाधिकारी व  सदस्य,  मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.  
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली ला. अमोल महिमकर यांनी वाचन केले.ला.प्रा. धनाजी चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक  केले.ला.उन्मेश आटपाडीकर यांनी सचिवांचा अहवाल सादर केला. पाहुण्यांचा परिचय ला.प्रा.सौ. शाहिदा सय्यद, ला. प्रा. शिवशंकर तटाळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन ला. भीमाशंकर पैलवान यांनी केली तर आभार ला.प्रा.प्रसाद खडतरे यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)