शेतीच्या पाणी वापराच्या पाणीपट्टी वाढीविरोधात शिवसेना मैदानात

0
    पंढरपुर (प्रतिनिधी) :- सरकारने नुकत्याच केलेल्या शेतीच्या पाणी वापराच्या पाणीपट्टी वाढीविरोधात आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. आज पंढरपूर तहसील कार्यालयात तहसीलदार श्री.सुशिल बेल्हेकर यांना या बाबत शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संजय घोडके म्हणाले की, "उपसा पद्धतीने पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यापूर्वी १२० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे वसुली केली जात होती. कॅनॉल व इतर ठिकाणाहुन पाणी घेणाऱ्यांना हेक्टरी १२०० रुपये व त्यावर २० टक्के स्थानिक सेसने पाणीपट्टी वसूल करण्यात येणार असल्याचा फतवाच सुलतानी सरकारने काढला आहे. सुलतानी सरकारने शेतकऱ्यावर जुलुम चालविल्याची भावना देखील घोडके यांनी व्यक्त केली..
यावेळी बोलताना युवासेनेचे युवानेते रणजित बागल म्हणाले की, जाहीरातबाज सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्ना पेक्षा उत्पादन खर्च वाढविण्यात सरकार आग्रही आहे, सरकारने शेतकऱ्यांना अडचणी आणण्यात कोणतीही कसुर ठेवली नाही. पाणीपट्टीच्या दरामध्ये दहा पट्टीने वाढ केल्याचे म्हटले आहे. रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची मागणी जास्त असते. प्रकल्पांवरून रब्बी हंगामासाठी दोन ते तीन व उन्हाळी हंगामासाठी पाच ते सहावेळा उपलब्ध पाणी पुरविणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात हंगामनिहाय अपेक्षीत पाणी पुरविले जात नाही त्यासाठी पाणीपट्टी आकारली जाते.आधी पाणीपट्टीनुसार करवसुली केली जात होती आता हेक्टरनिहाय दर ठरविले गेले. पाणीपट्टीत वाढ व त्याला स्थानिक सेसची जोड देण्याचा फतवा शासनाने काढला आहे. वीज दरात भरमसाठ वाढ, भारनियमन, विजेचा तुटवडा अशा असंख्य समस्येने शेतकरी त्रस्त आहे. त्यात गेल्या काही वर्षापासुन शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असुन या काळात एवढी वाढ करणे म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे युवासेनेचे रणजित बागल यांनी बोलताना सांगितले.
       यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी बोलताना आपण या आंदोलनात शिवसेनेसोबत आहोत, व आगामी काळात या मागणीसाठी लढा उभारावा यावेळी आम्ही सोबत असु असे सांगुन पाठिंबा व्यक्त केला..
       यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख उत्तम कराळे, विभागप्रमुख उमेश काळे, बंडु घोडके, गौसपाक आत्तार, पितांबर कापसे, एस.शेख, स्वप्निल गावडे, कपिल पाटील, डाॅ. अनिल क्षीरसागर, प्रकाश बंडगर, अर्जुन भोसले, औदुंबर चव्हाण, पांडुरंग काटकर, परशु नायकुडे, अप्पा गायकवाड, विजय जाधव, रविंद्र विलास शिंदे, संजय पवार, महेश यादव, अजित शेवतकर, महेश कांबळे, शिवाजी काळे, युनुस मुलाणी, महावीर हाके, शंकर सावंत, ज्योतीराम सावंत, नाना कोळी, आप्पा कदम, राजु सुर्यवंशी, अर्जुन भोसले, परशुराम पेहे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)