हाडे मजबूत असणे निरोगी आरोग्यास महत्त्वाचे - डॉ. सुनील लवटे

0
लायन्स क्लब ऑफ सांगोला व लवटे आर्थोपेडिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हाडांमधील ठिसूळपणा तपासणी शिबिर

         सांगोला (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ सांगोला व लवटे आर्थोपेडिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरवसे - केदार यांच्या निवासस्थानी(खारवट-वाडी) येथे लायन्स क्लब सांगोला यांच्या वतीने हाडांमधील ठिसूळपणा तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी मार्गदर्शक MJF ला. प्रबुद्धचंद्र झपके, PMJF ला. विजयकुमार राठी झोन चेअरमन.ला. प्रा. धनाजी चव्हाण, या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर सुनील लवटे, सां.ता.शि.प्र.मं. खजिनदार  शं.बा.सावंत, लायन्स क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष उन्मेश आटपाडीकर, सचिव ला.अजिंक्य झपके, खजिनदार ला. नरेंद्र होनराव, ला.बाळराजे सावंत,सुरवसे - केदार परिवारातील सर्व सदस्य, यतिराज मित्र मंडळ व खारवटवाडी मधील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला शंभर पेक्षा जास्त लोकांनी हाडांमधील ठिसूळपणाची तपासणी करून घेतली.
       या  कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सुनील लवटे यांनी शरीरामधील हाडे मजबुत हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते.अनेक वेळेस आहार पदार्थातून कॅल्शियम व व्हिटॅमिन-D मिळत असते. हाडांच्या मजबुतीसाठी दूध व दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा. योग्य आहाराच्या जोडीला व्यायामाची जोड दिल्यास, सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरल्याने आपली हाडे मजबूत व बळकट होतात असे प्रतिपादन केले.
      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लायन्स क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष ला. उन्मेश आटपाडीकर यांनी लायन्स क्लबच्या वतीने हाडांमधील ठिसूळपणा तपासणी हे समाजासाठी उपयोगी उत्तम तपासणी शिबीर आहे . याबरोबर लायन्स क्लबचे होणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल ही माहिती दिली.
      डॉ. सुनील लवटे पुढे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले- हाडे मजबूत असणे निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. वाढत्या वयाबरोबर हाडांची झीज झाल्यामुळे किंवा स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर हाडांच्या अनेक तक्रारी होत असतात . अयोग्य आहार घेणे, व्यायाम न करणे यामुळे हाडे ठिसूळ बनतात व हाडे सहज फ्रॅक्चर होऊ शकतात, सांधेदुखी सारख्या अनेक तक्रारी होऊ शकतात. त्याचे योग्य निवारण केले तर आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकू असे मत व्यक्त केले.
        लायन्स क्लबचे झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी आपल्या मनोगतमध्ये कै.भिमराव सुरवसे यांनी समाजामध्ये लोकांना सेवाकार्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी खूप कार्य केले असे सांगितले.पाणपोई,रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबिर यामधील त्यांचे योगदान सांगितले. तोच वारसा जपत सुरवसे - केदार परिवार, त्यांचे चिरंजीव यतिराज सुरवसे हे देखील तेवढ्याच तत्परतेने व समाजाच्या सेवेसाठी कार्यरत आहेत, याचा मनस्वी आनंद होत आहे असे सांगितले. 
       कार्यक्रमाची सुरुवात कै. भिमराव सुरवसे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. व त्यानंतर खारवटवाडी मधील ग्रामस्थांनी या हाडाच्या तपासणी शिबिरास सहभाग घेऊन हाडांची तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमासाठी सुरवसे - केदार परिवारतील सर्व सदस्य, मधुकर केदार, विठ्ठल खडतरे, सचिन सुरवसे, पोपट केदार सर, रमेश सुरवसे, वसंत सुरवसे, महादेव बाबर, कुमार ढोले, नामदेव खडतरे, अशोक खडतरे इ.मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता चहापान व अल्पोपहाराने  झाली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)