पंढरपूर (प्रतिनिधी) -- महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष, पांडुरंग परिवाराचे श्रध्दास्थान, जनतेच्या मनातील आमदार, आपल्या नावाप्रमाणे "श्रीमंत" असणारे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे तृतीय पुण्यस्मरण
गुरुवार दि.१७ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांनी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक स्मृतीस्थळ, वाखरी येथे संपन्न होत आहे.
वाखरी येथे सदर कार्यक्रम सकाळी ९ वा. प्रतिमा पूजनाने सुरू होणार आहे. त्यानंतर भव्य रक्तदान शिबीर सकाळी ९.३० वा.आयोजित केले आहे. तर सकाळी १० वा. अदरांजलीपर मनोगते होणार आहेत. ठिक सकाळी ११ वा. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. किर्तनानंतर ठिक १२ वा. पुष्पाजंली होणार आहे. तद्नंतर दुपारी १२.३० ते २.०० यावेळेत महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.
तरी आपण सदर कार्यक्रमास "नियोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक स्मृतीस्थळ", वाखरी येथे उपस्थित रहावे असे आवाहन देशपातळीवरील "सर्वोत्कृष्ट साखर कारखाना " म्हणून गौरविलेला व महाराष्ट्र शासनाचा " वनश्री व सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह.सा.का.लि.श्रीपूरचे चेअरमन मा. आ. प्रशांत परिचारक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, व्हा. चेअरमन कैलास खुळे तसेच सर्व संचालक, अधिकारी, सभासद व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.
--------------------------------------------------
पंढरपूर शहरात गुरुवार दि. १७ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांचे तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
--------------------------------------------------