२०, २१ ऑगस्ट रोजी पुण्यात अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन
पुणे (प्रतिनिधी) - ८८ वर्षांची परंपरा असलेल्या भालचंद्र ज्योतिष विद्यालय व सातारा येथील प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील उद्यान प्रसाद सभागृहात ४१ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन संपन्न होणार आहे सदर अधिवेशनात महाराष्ट्रातील २० चे वर ज्योतिष संस्था सहभागी झालेल्या आहेत. या अधिवेशनाची ५०% प्रतिनिधी नोंदणी गेल्या वर्षीच झाली असल्याची माहिती प्राचार्य रमणलाल शहा यांनी दिली.
या अधिवेशनात भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद मार्गदर्शन करणार आहेत. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिल्ली येथील डॉ. अजय भांबी तसेच बडोदा येथील पिरॅमिड वास्तूचे प्रणेते डॉ. जितेंन भट व अहमदाबाद येथील ज्योतिष गुरु पंडित कुंवरजी मार्गदर्शन करणार आहेत, तर दिल्ली येथील पंडित पदम उपाध्याय, गाझियाबाद येथील आचार्य सागरजी, चंदीगड येथील पंडित राजेश वशिष्ठ, अहमदाबाद येथील डॉ. भरतभाई खंडेडिया, पंडित कार्तिक रावल, उदयपूर येथील डॉ. कल्पना शर्मा, मुंबई येथील डॉ. हीना ओझा, डॉ. नितीन गोठी, पुणे येथील डॉ. सुहास डोंगरे, पंचांगकर्ते पंडित सदाशिव शाळीग्राम, श्री. कैलास केंजळे, डॉ. अरुण हुपरीकर, डॉ. सौ. जयश्री बेलसरे आदी मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात सर्वसामान्य नागरिकांसाठी निःशुल्क मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती भालचंद्र ज्योर्तिविद्यालयाचे अध्यक्ष पंडित नवीनकुमार शहा यांनी दिली.
पहिल्या दिवशी होणाऱ्या हिंदी अधिवेशनाचे उद्घाटन पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक श्री. हेमचंद्र दाते करणार आहेत, तर अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व टॅरो तज्ज्ञ अॅड. सौ. सुनीता पागे असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून अॅड. वैशाली अत्रे असणार आहेत.
दुसऱ्या दिवशीचे मराठी अधिवेशनाचे उद्घाटन ग्वाल्हेर येथील विख्यात ज्योतिर्विद डॉ. रमेश वायगावकर करणार आहेत. गुरुश्री प्रिया मालवणकर स्वागताध्यक्ष असून, अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विख्यात ज्योतिर्विद तसेच ग्रंथ लेखक श्री व. दा. भट असणार आहेत. समारोप अध्यक्षस्थानी ज्येष्ठ के पी. अभ्यासक श्री विजयकुमार उर्फ दादा वाणी असणार आहेत.
या अधिवेशनाचे शुल्क फक्त १०००/- रुपये आहे. यामध्ये दि. २० व २१ ऑगस्ट रोजीचे दुपारचे भोजन व सायंकाळचा चहा. याशिवाय 'ग्रहांकित' या ज्योतिषविषयक मासिकाचे ५५०/- रुपये किमतीचे दोन अंक आपणाला मिळणार आहेत. याशिवाय ७१ वर्षांचा ज्योतिषविषयक अभ्यास व व्यासंग असलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्योतिषी प्राचार्य रमणलाल शहा यांचे 'ज्योतिषशास्त्राच्या एका नियमात जगातील बहुसंख्य व्यक्ती' एक हजारच्या आसपास व्यक्तींच्या कुंडल्या. यामध्ये भारतातील व जगातील राष्ट्रपती, पंतप्रधान, लेखक, पत्रकार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, धनाढ्य व्यक्ती, कारखानदार, उद्योजक, अभिनेते, संगीत दिग्दर्शक अशा जवळजवळ सर्व क्षेत्रांतील पत्रिका फक्त एका नियमात बसवून दिल्या आहेत. तसेच 'ज्योतिषशास्त्राची प्रचिती' या पुस्तकामध्ये पत्रिकेतील बारा स्थानांची संपूर्ण माहिती व महत्त्वाच्या व्यक्तींच्या पत्रिकांचे विश्लेषण दिलेले आहे. ही दोन पुस्तके ज्योतिषांना संग्राह्य अशी आहेत.
या दोन्ही पुस्तकांची किंमत ६०० /- रुपये •आहे. त्यामुळे या अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींना १०००/- रुपयांत ही ११५०/- रुपयांची पुस्तके मिळणार आहेत. ही पुस्तकांची सवलत फक्त या अधिवेशनापुरती मर्यादित आहे. अधिक माहितीसाठी अधिवेशनाच्या कार्यवाह आचार्या सौ. गौरी केंजळे यांच्याशी ९११२२९३७५९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तरी ज्योतिष अभ्यासकांनी या अधिवेशनाची दि. १५ ऑगस्टपूर्वी नोंदणी करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे.