पंढरपूर (प्रतिनिधी) - माजी आमदार कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी जेष्ठ पत्रकार सर्वश्री रमेश घळसासी, व्यापारी इकबाल बागवान, बसवेश्वर देवमारे, रामचंद्र मेडसिंगकर , संभाजीराजे शिंदे, प्रशांत (बाबा) धुमाळ, हृषिकेश निंबाळकर, विक्रांत बोडके, ओकार चव्हाण, दिपक चव्हाण, पत्रकार यादव इ. मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम माजी शिक्षण मंडळ सभापती, माजी नगरसेवक श्री. संजय निंबाळकर, नगरसेवक सिकंदर बागवान यांनी आयोजित केला. शेवटी वृद्धाश्रम व्यवस्थापक राक्षे यांनी आभार मानले.