पंढरपूर (प्रतिनिधी) : - महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष अनुदान म्हणून पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदांसाठी विविध विकास कामांना १० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. मंजूर झालेल्या या निधीमध्ये मंगळवेढा नगरपरिषदसाठी ५ कोटी व पंढरपूर नगरपरिषदसाठी ५ कोटी एवढा निधी आहे. आ. आवताडे यांच्या प्रयत्नांनातून मंजूर सदर निधीमुळे पंढरपूर व मंगळवेढा शहरांच्या विविध विकास कामांना चालना मिळणार आहे. सदर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध होणेकामे आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. देशातील एक महत्त्वपूर्ण आणि खूप मोठी अध्यात्मिक परंपरा असलेल्या पंढरपूर व मंगळवेढा शहरांसाठी या निधीमुळे भौतिक सोयी - सुविधा खूप सक्षम आणि व्यापक होणार आहेत.
देवभूमी आणि संतभूमी अशी सांप्रदायिक ख्याती असणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा शहरातील स्थानिक नागरिकांसाठी आमदार समाधान आवताडे यांनी भौतिक सोयी - सुविधा सक्षम करण्यासाठी व शहरवासियांचे जीवनमान उंचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन्ही नगरपरिषदांसाठी उपलब्ध केलेला हा निधी दोन्ही शहरांच्या सर्वांगीण प्रगतीचा सर्व समावेशक सेवासुत आहे. आमदार आवताडे यांची विकासाची ही व्यापक दृष्टी मतदारसंघाचा प्रगती आलेख आणखी समृद्ध आणि विस्तारित करेल
करुणा निलेश आंबरे
माजी नगरसेविका पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर