पंढरपूर दि. ३ (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत आबा पाटील साहेब यांच्या ४० व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कारखाना येथे सर्व रोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर असे विविध समाजपयोगी कार्यक्रम राबवुन साजरा करणेत येत आहे. त्यामध्ये कारखाना कार्यस्थळावर आज दिनांक ०३.०८.२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्री सुर्यकांत भाऊसाहेब मोरे तालुका कृषी अधिकारी पंढरपूर व श्री सुभाषराव वसंतराव भोसले माजी नगराध्यक्ष पंढरपूर यांचे शुभहस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी ज्ञानोबा भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, सौ. सविता रणदिवे, श्रीमती कलावती खटके, दशरथ जाधव, अशोक तोंडले, तुकाराम मस्के, धनाजी खरात, सचिन पाटील, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड व कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.