पंढरपूर (प्रतिनिधी) - कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक, पांडुरंग परिवारातील पदाधिकारी पांडुरंग परिवारातील युवा नेते मित्रमंडळी, आणि कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींकडून करण्यात आले आहे.
गुरुवारी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा स्मृतिदिनी पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये तसेच ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये सकाळी प्रतिमा पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वाखरी येथील नियोजित कर्मयोगी सुधाकरपंतांच्या स्मारकाच्या ठिकाणी कीर्तन व पुष्पांजली कार्यक्रमाचे आयोजन कारखान्याने केले आहे.
तरी या सर्व कार्यक्रमास पंढरपूर शहरातील नागरिकांनी पांडुरंग परिवारातील सदस्य हितचिंतक मित्र आप्तेष्ट यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून मोठ्या मालकांचा विचारांचा वारसा सेवारुपी आत्मसात करावा. असे आवाहन या निमित्ताने आमदार प्रशांतराव परिचारक व उमेशराव परिचारक यांच्या वतीने युवा नेते प्रणव परिचारक यांनी केले आहे.